MSBSHSE 10th, 12th Result 2024: दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल 10 मे ला लागू शकतात.

MSBSHSE 10th, 12th Result 2024: निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच, MHBSHSE बोर्ड त्यांच्या अधिकृत वेबसाईट – maharesult.nic.in वरती निकालाची लिंक चालु करतील ज्यामुळे, विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतील

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( MSBSHSC ) लवकरच SSC ( इयत्ता 10 वी ) आणि HSC ( इयत्ता 12 वी ) बोर्डाचे निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट नुसार , 10वी आणि 12वी बोर्ड या दोन्ही वर्गाचे निकाल 10 मे 2024 जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु अजूनही बोर्ड निकालाची तारीख आणि वेळ याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

परंपरेनुसार, MSBSHSC बोर्ड चे अधिकारी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करतील. बोर्ड पत्रकार परिषदेत टोपरचे नाव व एकूण उत्तीर्ण टक्केवारी सांगितली जाईल. तसेच लिंगनीहाय उत्तीर्ण टक्केवारी, कांपारमेंट परीक्षा आणि इतर महत्वपूर्ण तपशील देखील उघड करतील.

कोणत्या वेबसाइट वर रिझल्ट चेक करावा

MSBSHSE official Websites:

mahresult.nic.in

mahahsscboard.in

Other websites:

results.gov.in

results.nic.in

hscresult.mkcl.org

mahahsc.in

MSBSHSE 10th, 12th Result 2024: लॉग इन करण्यासाठी लागणारे आवश्यक माहिती

रिझल्ट बघण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून लॉगइन करू शकता आणि आपला निकाल तपासू शकता.

MSBSHSE 10th, 12th Result 2024: रिझल्ट कसा चेक करावा.

-पहिले MSBSHSC च्या ऑफिशल वेबसाइट वरती जा : https://mahresult.nic.in / https://mahahsscboard.in

-‘MAHA SSC Result 2024’/ ‘MAHA HSC Result 2024’ ह्या लिंक वरती क्लिक करा ह्या लिंक तुम्हाला होमपेज वरती मिळतील.

-त्या नंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाईप करा.

-रिझल्ट तुमच्या स्क्रीन वरती दिसेल

-तुम्ही रिझल्ट डाऊनलोड आणि प्रिंट करू शकता.

पास होण्यासाठी कमीत कमी किती टक्केवारी पाहिजे ?

MSBSHSE च्या नियमानुसार, बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थेरी आणि प्रॅक्टिकल मध्ये कमित कमी 35% गुण मिळणे आवश्यक आहे.

Motorola Edge 40 Neo ह्या स्मार्टफोन मध्ये आहेत धमाकेदार फीचर आणि किंमत पण आहे कमी