Bajaj CNG Bike लॉन्च तारीख झाली पक्की

-18 जून ला लॉन्च करण्याची सूचना दिलेली आहे.

-भारतातील पहिली CNG बाइक असेल

Bajaj CNG Bike: Pulsar NS400Z लाँच करताना, बजाज ऑटोने अधिकृतपणे सांगितले आहे की ते 18 जून 2024 रोजी भारतात त्यांची CNG वर चालणारी भारतातील पहिली मोटारसायकल लॉन्च करणार आहेत. ही फक्त पहिली बजाज CNG बाइक नाही तर कॉम्प्रेसड नॅचरल गॅस वर चालणारी भारतातील पहिली mass-market ऑफर देखील असेल.

ह्या बाईक चे नाव ब्रुझर असण्याची शक्यता आहे. त्यांच्या स्पाय शॉटस्मधील नमुना खेचणारे 110-125cc बाईक प्रमाणे आकारमान दाखवल्यामुळे हे स्पष्ट होत आहे की ही ह्या बाईक च मार्केट रोज वापरासाठी लागणाऱ्या बाईक सारख असेल. बाईक मध्ये एक मोठी इंधन टाकी , एक सपाट आणि लांब सीट, एक ग्रब रेल, आणि प्रोटेक्शन साठी नकल गार्डसह एक हँडलबार देखील समाविष्ट आहे. LED हेडलॅम्प आणि टेल लॅम्प हे स्पयशॉट मध्ये दिसत होते , पण आशा आहे की बाईक मध्ये डिजिटल कॅन्सोल असेल.

नक्कीच गाडीचे हार्डवेअर उत्तम आहेत. काही गोष्टी अगदी मूलभूत असतात. दोन्ही साईड ने अरुंद टायर एक लहान फ्रंट डिस्क ब्रेकसह 17 इंच औली व्हिलस चालवत असल्याचे दिसते . समोरचा सस्पेंशन सेटअप पूर्णपणे कव्हर केला असला तरी तो कॉमन टेलिस्कोपिक प्रकारचा असावा. तर मागील भाग मोनोशॉकने सस्पेंड केलेला असावा अशी अपेक्षा आहे. ब्रेकिंग सेटअप किमान सिंगल चॅनल ABS सेटअपसह असू शकते.

अद्याप किंमतीच्या बाबतीत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तरी पण बजाज आणि त्यांच्या बाईक्सची किंमत ही परवडणाऱ्या असतात ही गोष्ट लक्ष्यात घेवून अंदाज लावू शकतो की ही बाईक सामान्य माणसाला परवडणारी असावी